एज्युकेशन सोसायटी कडवई संचलित द कडवई इंग्लिश स्कूल विद्यालयाचे पावसाळी शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये घवघवीत यश.
रत्नागिरी : रत्नागिरी क्रीडा विभाग आयोजित तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धांचे आयोजन संगमेश्वर तालुक्यामध्ये साडवली येथे दिनांक 27 व 28 सप्टेंबर रोजी करण्यात आले होते विविध स्पर्धेच्या इव्हेंट्स मध्ये गोळा फेक 14 वर्षाखालील मुली या गटामध्ये द कडवई इंग्लिश स्कूल या विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी दानिया वसीमराजा जुवळे या विद्यार्थिनीने तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. दानिया संगमेश्वर तालुक्याचे प्रतिनिधित्व जिल्हास्तरावर करणार आहे याकरता तिची जय्यत तयारी सुरू आहे तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरांवरून तिचे अभिनंदन केले जात आहे. खेळामध्ये विद्यार्थी आपले उज्वल भविष्य बनवू शकतात आणि दानिया मध्ये ते गुण असल्याचे नेहमीच आम्हास दिसून आल्याचे प्रतिपादन संस्था अध्यक्ष श्री सादिक काझी यांनी केले. उपाध्यक्ष डॉ अन्सार जुवळे, मुख्याध्यापक प्रांजल मोहिते , रिजवान कारीगर यांनी दानिया व तिचे मार्गदर्शक शिक्षक श्री जावेद दखनी व श्री सामाईन खोत यांचे अभिनंदन करून भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.