पावस येथे सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या विरोधात गुन्हा
रत्नागिरी ः प्रतिनिधी
तालुक्यातील पावस-पानगलेवाडी ते पावस बाजारपेठेत जाणार्या रस्त्यावरील सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणार्या विरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवार 25 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.30 वा.सुमारास करण्यात आली.
सुधीर दत्तात्रय घाटकर (50,रा.तांबळवाडी पावस,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हेड काँस्टेबल संतोष करळकर यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, गुरुवारी सायंकाळी संशयित हा त्याच्याकडे दारु पिण्याचा कोणताही परवाना नसताना सार्वजनिक ठिकाणी हातामध्ये देशी दारुची बाटली घेउन मद्यप्राशन करताना मिळून आला. त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 84 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.