पूर्णगड येथे किरकोळ कारणातून महिलेला मारहाण
रत्नागिरी : तालुक्यातील पूर्णगड बाजारकरवाडी येथे किरकोळ कारणातून महिलेला वृध्द दाम्प्त्याने काठीने मारहाण केली. ही घटना मंगळवार २३ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वा. सुमारास घडली. वैशाली वसंत चव्हाण (६५), वसंत आत्माराम चव्हाण (७७, रा. पूर्णगड बाजारकरवाडी, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात वैष्णवी वैभव चव्हाण (३६, रा. पूर्णगड बाजारकरवाडी, रत्नागिरी) यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
त्यानुसार मंगळवारी सकाळी त्या घरात नाष्टा करत होती. त्यावेळी तिने संशयित वैशाली चव्हाणला तुम्ही कचरा काढू नका मी काढते अस सांगितले. त्याचा राग आल्याने तिने कपडे वाळत घालण्याच्या काठीने वैष्णवीच्या दोन्ही हातांवर, पाठीवर, डोक्यावर मारहाण केली. त्यानंतर संशयित वसंत चव्हाण यानेही तिला शिवीगाळ करत हातांनी ढकलाबुकली करुन ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी अधिक तपास पूर्णगड पोलिस करत आहेत.