निवळी-बावनदी येथे हातभट्टीची दारु विक्रीवर पोलिसांची छापा
रत्नागिरी ः तालुक्यातील निवळी-बावनदी पुलाखाली पोलिसांनी हातभट्टीदारु विक्रीवर कारवाई केली. या कारवाईत ९४० रुपयांची ९ लिटर दारु जप्त केली. संशयिताविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयवंत जनार्दन रेवाळे (वय ४२, रा. तळेकांटे, रेवाळेवाडी, ता. संगमेश्वर) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २४) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास निवळी-बावनदी पुलाखाली स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या झाडीच्या आडोशाला निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित विनापरवाना हातभट्टीची ९४० रुपयांचा ९ लिटर दारु विक्रीसाठी स्वतःकडे बाळगलेल्या स्थितीत सापडला. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल लक्ष्मण कोकरे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
.