नेवरे येथील वृद्धाचा मृत्यू
रत्नागिरी ः तालुक्यातील नेवरे येथे घराच्याबाहेरील परिसरात मृतावस्थेत वृद्ध आढळला. उत्तरीय तपासणीसाठी त्याचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. दिवाकर बाळकृष्ण सुर्वे (वय ७०, रा. भंडारपुळे मुळ ः नेवरे, रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. २५) दुपारी बाराच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिवाकर सुर्वे हे मोलमजूरी करत असत त्यांना मद्याचे व्यसन होते. गुरुवारी दुपारी ते मृतावस्थेत आढळले. नातेवाईक सुरेश एकनाथ सुर्वे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली. पोलिसांनी सुर्वे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केला आहे.