मिऱ्या समुद्रकिनारी आढळले देवमाशाचे अवशेष
रत्नागिरी : स्थानिक रहिवाशांना मिऱ्या किनारी तीव्र कुजकट वास येत असल्याने त्यांनी किनाऱ्याची पाहणी केली.तेव्हा त्यांना पाण्यात आणि किनाऱ्यावर अत्यंत मोठ्या आकाराच्या मृत झालेल्या एका देव माशाचे अवशेष आढळून आले. हा देवमासा कधी मृत झाला आणि तो किनाऱ्यावर कसा आला, याबद्दल अधिक माहिती मिळू शकलेली नाही.
यापूर्वीदेखील रत्नागिरी, मालगुंड आणि गणपतीपुळे यांसारख्या किनारपट्टीवरील अनेक महत्त्वाच्या समुद्रकिनाऱ्यांवर मृत समुद्री जीवांचे अवशेष आढळले आहेत.