खेड येथील भाजलेल्या प्रौढाचा मृत्यू
खेड : तालुक्यातील कोरेगाव-बेलवाडी येथे दुचाकीतील पेट्रोल अंगावर ओतून घेत भाजलेल्या प्रौढ़ाचा मृत्यू झाला. रवींद्र बाळकृष्ण शिंदे (४८, रा. कोरेगाव-बेलवाडी) असे मृत प्रौढाचे नाव आहे. येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सुरेश शिंदे यांनी पोलीस ठाण्यात खबर दिली. त्यांचे भाऊ रवींद्र शिंदे याने घरातील सर्व माणसे झोपलेली असताना मानसिक स्थिती बिघडल्याने दुचाकीतील पेट्रोल अंगावर ओतून घेत पेटवून घेतले. गंभीर भाजल्याने उपचारासाठी सर्वप्रथम कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात घेऊन जात असताना संगमेश्वर दरम्यान त्याचा मृत्यू झाला.