ठाण्यातील चरस तस्कराची रत्नागिरी पोलीस करणार चौकशी
रत्नागिरी
दापोली आणि मंडणगड येथे सापडलेल्या चरस या अंमली पदार्थाचा तपास कसून तपास रत्नागिरी पोलीस करत आहेत. दरम्यान ठाणे पोलिसांनी मसुद बहुद्दीन ऐनरकर (२९) याच्या ताब्यातून १ कोटी रुपयांचा अमली पदार्थाची तस्करी करताना अटक केली आहे. मसुद हा मुळचा दापोलीतील रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार ठाणे पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताला लवकरच त्याला आम्ही चौकशीसाठी ताब्यात घेणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक नितिन बगाटे यांनी दिली.
मंडणगड तालुक्यातील साखरी खाडीकिनारी लपवून ठेवलेल्या अमली पदार्थांच्या ४ पिशव्या जप्त करण्यात दापोली पोलिसांना यश आले आहे. त्या पिशव्यांमध्ये ४.५१ किलो वजनाचे चरस हा अंमली पदार्थ सापडला, दापोली पोलिसांनी १५ तारखेला केळशी येथील मोहल्ल्यात अब्रार डायली या संशयिताकडून ९९८ ग्रॅम चरस जप्त केला आहे. त्याच्याकडून सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता. या दरम्यान चरस या अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या दापोली येथील मसुद ऐनरकर याला ठाणे पोलिसांनी सापळा रचून अटक केली.