खैर तस्करीत मंडणगडातील ५ तस्करांचा सहभाग
मंडणगड:
रायगड जिल्ह्यातील खैर तस्करी प्रकरणी तालुक्यातील पाच जणांना रायगड वनविभागाने १० लाखांचा मुद्देमाल व एक वाहन ताब्यात घेतले.
पाचजण रायगड वनपरिक्षेत्र खालापूर परिमंडळ उंबरे येथे खैराच्या चोरीप्रकरणी तस्करी करणारे गुंतल्याची माहिती वनविभागाला मिळाल्याने कारवाई करण्यात आली. शेतकऱ्यांच्या मालकीच्या जमिनीतून परस्पर चोरीच्या इराद्याने खैराची झाडे तोडून नेल्याच्या तक्रारी गेल्या शेतकऱ्यांनी केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या कारवाईने तालुक्यात खळबळ उडाली आहे. या कारवाईने तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
खैराची चोरी व विनापरवाना वाहतूक केल्यास वाहन जप्ती, आर्थिक व्यवहार तपासणी, बँक खाती गोठवणे इत्यादी स्वरुपाची रितसर कार्यवाही करण्यात येईल, असे वनविभागाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.