विनापरवाना मद्यप्राशन करणार्या दोघांविरोधात गुन्हा
रत्नागिरी:
तालुक्यातील मालगुंड आणि चाफेरी येथे विनापरवाना मद्यप्राशन करणार्या दोघांविरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवार 19 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.30 ते 7 वा.कालावधीत करण्यात आली.
हेमकांत सत्यविजय पवार (39,रा.भगवतीनगर निवेंडी,रत्नागिरी) आणि अजित अनंत आग्रे (41,रा.वाटद खंडाळा,रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. हे दोघेही आपल्याकडे दारु पिण्याचा परवाना नसतानाही सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करत असताना ही कारवाई करण्यात आली. त्यांच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 84 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.