गावखडी-सुरुच्या बनात मद्यपान करणाऱ्या प्रौढाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः तालुक्यातील गावखडी-सुरुचे बन येथील झाडाच्या आडोशाला मद्यपान करणाऱ्या प्रौढाविरुद्ध पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष रामचंद्र कांबळी (वय ४४, रा. गावखडी, रत्नागिरी) असे संशयित प्रौढाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. १८) सायंकाळी पाचच्या सुमारास गावखडी-सुरुचे बन येथे निदर्शनास आली. पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित संतोष कांबळी हे मद्यपानाचा परवाना नसताना मद्यपान करत असताना आढळले. या प्रकरणी सहायक पोलिस फौजदार संजय शिवगण यांनी पुर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित प्रौढाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे