साळवी स्टॉप नजीक मद्यप्राशन करणाऱ्या दोघांवर गुन्हा
रत्नागिरी ः प्रतिनिधी
शहरातील जलतरण तलावाकडे जाणार्या रस्त्याच्या बाजुला सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणार्या दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवार 17 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 ते 4.15 वा.कालावधीत करण्यात आली.
अनिल फौजदार गुप्ता (28,मुळ रा.उत्तरप्रदेश सध्या रा.नाचणे,रत्नागिरी) आणि बिपअल शंकर हलदार (28,मुळ रा.पश्चिम बंगाल) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. हे दोघेही आपल्याकडे मद्यप्राशन करण्याचा कोणताही परवाना नसताना सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करताना ही कारवाई करण्यात आली.