मंडणगडात दोघांचा प्रौढावर प्राणघातक हल्ला
जखमीला उपचारासाठी हलवले
खेड:
मंडणगडतालुक्यातीलनिगडीगावानजीक मारुती मंदिराजवळ रविवारी रात्री एका व्यक्तीवर लाकडी काठीने प्राणघातक हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात नझीर मुतलीक कोंडेकर (वय ५३, रा. निघडी मोहल्ला) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी मंडणगड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र त्याला दुखापत गंभीर झाली असल्याने महाड येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे समजते
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी जिशान अस्लम माटवणकर आणि निहाल अस्लम माटवणकर (दोघेही रा. निघडी मोहल्ला) यांनी फिर्यादीला घराबाहेर बोलावून आणलेल्या बुलेटवर बसवून मंदिराजवळ नेले. तेथे त्यांच्याशी भांडण करून शिवीगाळ केली आणि “तुझी हत्या करतो” अशी धमकी देत लाकडी काठीने डोक्यावर, नाकावर, पाठीवर, पोटावर आणि गुप्तांगावर मारहाण केल्याचे समजते.हल्ल्यात फिर्यादीच्या नाकातून आणि तोंडातून रक्तस्राव झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत सखोल चौकशी मंडणगड पोलीस करीत आहेत मात्र मारहाणीचा प्रकार कशामुळे झाला या बाबी च्या खोलमध्ये पोलिसांनी जाऊन तपास करावा अशी मागणी होत आहे जीशान माटवनकर यांच्यावर यापूर्वी अनेक गुन्हा दाखल झाल्या होत्या असे समजते