चिपळुणात तरुणाची आत्महत्या
चिपळूण : शहरातील अमेय अपार्टमेंटमध्ये एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी १३.३० ते दुपारी ४.५० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नीलेश यशवंत भोसले (४४, कापसाळ, नवीन वसाहत) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबतची खबर हेमंत यशवंत भोसले याने दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेय पार्क येथील सदनिकेमध्ये नीलेश याने नायलॉनच्या दोरीने किचनच्या पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.