सार्वजनिक ठिकाणी मद्यपान ; तरुणाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः शहरानजिकच्या चंपक मैदान येथील सार्वजनिक रस्त्यावर मद्यपान करणाऱ्या तरुणाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अक्षय रमेश मयेकर (वय २५, रा. काळबादेवी, मयेकरवाडी, रत्नागिरी) असे संशयित मद्यपान करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. १४) सायंकाळी साडेसातच्या सुमारास चंपक मैदान येथे निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित तरुण मद्यपानाचा परवाना नसताना सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करत असताना सापडला. या प्रकरणी सहायक पोलिस फौजदार मनोज पावसकर यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.