पाली कृषी मंडळात शेतकऱ्यांसाठी ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी शिबिर
रत्नागिरी : शेतकरी बांधवांनी शासनाच्या योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये म्हणून फार्मर आयडी तातडीने काढणे आवश्यक आहे. यामुळे प्रत्येक शेतकऱ्याची नोंद अधिकृतरीत्या होऊन शेतकरी हिताचे सर्व लाभ त्यांच्यापर्यंत वेळेवर व पारदर्शक पद्धतीने पोहोचतील असे आवाहन पाली मंडळ कृषि अधिकारी सचिन ढेरे यांनी केले आहे.
शेतकरी बांधवांना शासनाच्या सर्व कृषी योजनांचा थेट व पारदर्शक लाभ मिळावा यासाठी केंद्र शासनाने ‘ॲग्रीस्टॅक योजना’ सुरू केली आहे. या योजनेत नोंदणी करून फार्मर आयडी काढणे आता अनिवार्य करण्यात आले आहे.
गणेशोत्सवाच्या काळात गावी येणारे शेतकरी तसेच बाहेरगावी वास्तव्यास असलेले शेतकरी यांच्यासाठी पाली,जाकादेवी,करबुडे, तरवळ,निवळी,हातखंबा,खानू,नाणिज,साठरे,झरेवाडी,कापडगाव,तरवळ,आगवे परिसरांत विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले.
पाली कृषि मंडळात रत्नागिरी उपविभागीय कृषी अधिकारी फिरोज शेख,पाली मंडळ कृषी अधिकारी नितीन ढेरे,सहाय्यक कृषि अधिकारी
सागर सांगवे, अजय कल्याणकर, दिपक म्हादे, आकाश देशमुख,मनिषा पाटील तसेच नाणीज सरपंच विनायक शिवगण,पोलीस पाटील नितीन कांबळे, साठरे बांबर सरपंच तृप्ती पेडणेकर, उपसरपंच रुपेश खोचाडे यांनी फार्मर आयडी काढणेसाठी कॅम्पचे आयोजन करून या कामी शेतकऱ्यांना मदत केली.
यावेळी उपकृषि अधिकारी राहुल पाटील यांनी उपस्थितांना ग्रामस्तरावर शेतकरी कार्ड काढणेसाठी आवाहन केले.त्याबरोबरच पाली परिसरात ५० ठिकाणी विविध कॅम्पचे आयोजन करण्यात आले,यामध्ये पी.एम.किसान योजनेअंतर्गत असणारे लाभार्थी प्राधान्याने नोंदणी करण्यात आली.