दामले विद्यालयात आंतरराष्ट्रीयसाक्षरता दिन उत्साहात साजरा
रत्नागिरी, दि . ८ सप्टेंबर : शहरातील नगर परिषद शाळा क्रमांक १५, दामले विद्यालयात आज आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन उत्साहात साजरा करण्यात आला . यानिमित्त नवसाक्षरांचा सन्मान करण्यात आला.
यानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यासपिठावर शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सौ . कस्तुरी पराडकर, नगर परिषद प्रतिनिधी श्री . व्हनमोरे , मुख्याध्यापक श्री . भगवान मोटे, शिक्षक सौ . जुलेखा काझी, श्री . विलास शेंडगे आदी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी महाराष्ट्र राज्य नगर परिषद शिक्षक संघटनेच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय प्रेरणादायी शाळा पुरस्कार दामले विद्यालयाला प्राप्त झाल्याबद्दल शाळेचा सन्मान करण्यात आला. तसेच याच संघटनेचा राज्यस्तरीय सक्षम महिला शिक्षक पुरस्कार शाळेच्या शिक्षिका सौ . श्रद्धा गांगण यांना प्राप्त झाल्याबद्दल त्यांना गौरविण्यात आले. रोटरी क्लबचा या वर्षीचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्राप्त श्री . मोटे यांनाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला .
या कार्यक्रमाला नवसाक्षर अर्चना घडशी, लक्ष्मण जोशी, आशा कांबळे, श्री . भोजे, सौ . सविता आखाडे यांच्यासह स्वयंसेवक श्रेया जोशी व शिक्षक वृंद उपस्थित होते . आदी नवसाक्षर उपस्थित होते.
यावेळी सौ. पराडकर यांनी नवसाक्षरांसाठी व शासनाच्या साक्षरता मोहिमेसाठी आपण दररोज एक तास मार्गदर्शन करणार असल्याचे सांगितले . ज्या नवसाक्षरांना शिकायचे आहे त्यांनी आपल्याशी संपर्क करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले .