झापडे कांटे गावात आमदार किरण सामंत यांनी तालुक्याच्या अधिकाऱ्या सहित दिली भेट
गावातील प्रत्येक जनतेला शासकीय योजनेचा लाभ मिळवून द्या:- आमदार किरण सामंत यांनी दिल्या अधिकाऱ्यांना सूचना
लांजा – आमदार आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून लांजा तालुक्यातील झापडे कांटे गावात आमदार किरण सामंत यांनी भेट दिली. गावात पोहोचताच ग्रामस्थांनी आमदारांचे स्वागत केले.
या भेटीदरम्यान आमदार सामंत यांनी थेट जनतेशी संवाद साधत त्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. ग्रामस्थांनी पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती, वीज, शैक्षणिक सुविधा, तसेच रोजगाराच्या संधी यासंबंधी प्रश्न मांडले.
गावकऱ्यांच्या तक्रारी व मागण्या मनपूर्वक ऐकत आमदार सामंत यांनी संबंधित विभागाशी समन्वय साधून तातडीने निराकरण करण्याचे आश्वासन दिले. “जनतेच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करणे हेच माझे प्राधान्य आहे. गावागावातील विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही,” असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
या कार्यक्रमास मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. जनतेने थेट आमदारांपुढे प्रश्न मांडल्याने समाधान व्यक्त केले. यावेळी तालुक्यातील सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी,पदाधिकारी उपस्थित होते.