रत्नागिरी, ः तालुक्यातील खालगाव-जाकादेवी, पोचरी फाटा येथून दुचाकी चोरुन नेल्या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीराज प्रसाद सावंत व राजेंद्र राजन शिर्के (दोन्ही रा. मांजरे देसाईवाडी, ता. संगमेश्वर) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना बुधवारी (ता. ३) सकाळी सात ते साडेबाराच्या या कालावधीत खालगाव जाकादेवी पोचरी फाटा येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी रघुनाथ सखाराम गोताड (वय ७१ रा. खालगाव, जाकादेवी पोचरी फाटा, रत्नागिरी) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन संशयितांनी वृद्ध गोताड यांची १० हजार रुपये किंमतीची दुचाकी (क्र. एमएच-०८ एल २७७९) ही त्यांच्या संमतीशिवाय चोरून नेली. या प्रकरणी त्यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित श्रीराज सावंत व राजेंद्र शिर्के यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.