रितेश नरळकर अजूनही बेपत्ताच
चिपळूण : तालुक्यातील खांदाटपाली-मधलीवाडी येथे राहणारा रितेश विजय नरळकर हा ३० वर्षीय तरुण २८ एप्रिलपासून राहत्या घरातून बेपत्ता झाला होता. पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता तो कोठेही आढळून आलेला नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रितेशने १२वी पर्यंतचे शिक्षण घेतले असून त्याची उंची ५ फुट ५ इंच आहे. बांधा सडपातळ असून चेहरा उभट, नाक सरळ, रंग सावळा, केस कुरळे आहेत. पिंक रंगाचा टिशर्ट, काळ्या रंगाची हाफ पॅन्ट तसेच पायात स्लिपर परिधान केलेली आहे. याबाबतची खबर ऋषिकेश विजय नरळकर (२७, खांदाटपाली-मधलीवाडी) याने दिली आहे. पोलिसांनी रितेशचा शोध घेतला असता तो अद्याप सापडलेला नाही. तरी वरील वर्णनाची व्यक्ती आढळून आल्यास याविषयीची माहिती चिपळूण पोलिसांना, द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल पी. एस. जवरत करीत आहेत.