जिल्ह्यात १८ पर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश
रत्नागिरी
जिल्ह्यात १८ सप्टेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश अपर जिल्हा दंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवशी यांनी जारी केले आहेत. राजकीय पक्षांची विविध आंदोलने, मुंबई -गोवा महामार्गाचे रखडलेले काम, ईद ए मिलाद व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता रहावी, यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) प्रमाणे हा आदेश देण्यात आला आहे.
अंत्ययात्रा, धार्मिक विधी, लग्न सोहळा, सामाजिक सण, शासकीय कार्यक्रम, शासकीय सेवेत तैनात कर्मचारी, सार्वजनिक करमणुकीची सिनेमागृह, रंगमंच इत्यादी बाबींना प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाहीत. प्रतिबंधात्मक आदेशाच्या काळात कोणालाही मोर्चा, मिरवणुका तसेच सभा निवडणूक प्रचार सभेचे आयोजन करावयाचे झाल्यास संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे व अशी परवानगी घेतल्यानंतरच उपरोक्त प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाही.