निवळीत पडक्या घरात सापडला प्रौढाचा मृतदेह
रत्नागिरी : तालुक्यातील निवळी येथील पडक्या घरात प्रौढाचा मृतदेह मिळून आला. ही घटना सोमवारी १ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वा. सुमारास उघडकीस आली. प्रसाद श्रीराम कोकजे (४१, रा. निवळी कोकजेवठार, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. प्रसादला दारुचे व्यवन होते. सोमवारीही सायंकाळी निवळी-तारवेवाडी येथील एका पडक्या घरामध्ये तो मयत स्थितीत मिळून आला. याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.