खवटी नाका येथे मोटार अपघात; रिक्षाचालक जखमी
खेड : तालुक्यातील खवटी नाका येथे मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या मोटार अपघातात रिक्षाचालक जखमी झाला आहे. हा अपघात १ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडला. अनिल दाजी भोसले (४६, रा. विक्रोळी, मुंबई; मूळ रा. खोपी, शिरगाव कोंडवाडी, ता. खेड) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते स्वतःची रिक्षा (क्र. एमएच ०३ डीसी २३३९) चालवत मुंबईवरून गावी येत असताना खवटी नाका येथे मागून आलेल्या स्विफ्ट डिझायर कारने (क्र. जीजे ०१ आरएफ २१०५) त्यांच्या रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात अनिल भोसले यांचा डावा हात फॅक्चर झाला असून त्यांचे मित्र किरण आंबेकर यांनाही दुखापत झाली.