भंडारवाडा-भंडारपुळे येथील ताप आलेल्या प्रौढाचा मृत्यू
रत्नागिरी ः तालुक्यातील भंडारवाडा-भंडारपुळे येथील ताप आलेल्या प्रौढाला खासगी दवाखान्यात उपचार सुरु होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. जितेंद्र अनंत सुर्वे (वय ४८, रा. भंडारवाडा, भंडारपुळे, रत्नागिरी) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. १) दुपारी पावणेचारच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जितेंद्र सुर्वे यांना चार दिवस ताप येत होता. ते खासगी दवाखान्यात उपचार घेत होते. सोमवारी त्यांना प्रविण सुर्वे यांनी अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.