मुंबई-विलेपार्ले येथील प्रौढाचा आकस्मिक मृत्यू
पावस, : वाहत्या पऱ्यामध्ये बेशुद्ध अवस्थेत प्रौढाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. सतिश सखाराम पूजारी (वय ५१, रा. पोतदारवाडी, विलेपार्ले, मुंबई, सध्या रा. बेहेरेवाडी, पो. मेर्वी, रत्नागिरी) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. २८) दुपारी दीडच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सतिश पूजारी हे रविवारी (ता. २४) खबर देणार यांच्याकडे गणपतीसणा करिता आले होते. त्यांच्याघरी दुपारी गणपतीची स्थापना झाल्यानंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास ते न सांगता घरातून निघून गेले. बराच वेळ होऊनही ते परत आले नाहीत म्हणून गावात त्यांचा शोध घेतला असता ते अशोक बेहेरे यांच्या आंब्याच्या बागेजवळ काळीकोंड येथील पाण्याच्या वाहत्या पऱ्यामध्ये उपड्या स्थितीत आढळले. तात्काळ त्यांना उपचारासाठी रुग्णवाहिकेने प्राथमिक आरोग्य केंद्र पावस येथे दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.