सुकिवलीत वृद्धाची गळफासाने आत्महत्या
खेड : तालुक्यातील सुकिवली-ओझरवाडी येथे ६५ वर्षीय वृद्धाने आजारपणाला कंटाळून राहत्या घरी गळफास लावून लावून आत्महत्या केली. सुधाकर शंकर साळुंखे (६५, रा. सुकिवली-ओझरवाडी) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ते गेल्या चार वर्षांपासून कॅन्सरच्या आजाराने त्रस्त होते.
या आजारपणाला कंटाळूनच घरातील पडवीत असलेल्या लोखंडी पाईपला नायलॉनच्या दोरीने गळफास लावत आत्महत्या केली. उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. त्यानुसार येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.