गणेश विसर्जनावेळी एक जण गेला वाहून
खेड : दीड दिवसांच्या गणरायाचे विसर्जन करताना तालुक्यातील भोस्ते-रहाटेवाडी येथील एक तरुण पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेल्याची घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली. मंगेश लक्ष्मण पाटील (४५) त्याचे नाव आहे. या घटनेत अन्य एक जण बचावला.
वासुदेव गुरव असे बचावलेल्या तरुणाचे नाव आहे. भोस्ते- पाटीलवाडी आणि रहाटेवाडी येथील ग्रामस्थ दीड दिवसांच्या गणरायाला निरोप देण्यासाठी भोस्ते येथील जगबुडी नदीपात्रात. जात होते. मिरवणूक जगबुडी नदीपात्राजवळ आल्यानंतर भाविक गणरायाचे ‘विसर्जन करण्यासाठी पात्रात उतरले. याचदरम्यान मंगेश पाटील व त्याचा सहकारी वासुदेव गुरव हे देखील नदीपात्रात उतरले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने मंगेश पाटील हे पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेले.