लांजा गवाणे-गुरववाडी येथून वृद्ध बेपत्ता
लांजा:
तालुक्यातील गवाणे गुरववाडी येथील वृध्द ५ दिवसांपासून बेपत्ता आहे. ते घरातून फिरायला जातो, सांगून निघाले होते, मात्र घरात न परतल्याने त्यांच्या नातेवाईकाने लांजा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.
शांताराम रामा गुरव (७२, रा.गवाणे गुरववाडी, ता. लांजा) हे २६ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ४.३० च्या सुमारास त्यांची मुलगी सारिका हिला वाडीत फिरण्यासाठी जातो, असे सांगून घरातून निघून गेले. मात्र सर्वत्र शोध घेऊनही दुसऱ्या दिवशीही काहीच थांगपत्ता लागत नसल्याने दिलीप गुरव यांनी २७ सप्टेंबर २०२३ रोजी लांजा पोलिसात शांताराम गुरव बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
शांताराम गुरव यांची उंची ५ फूट ७ इंच, रंग सावळा, चेहरा उभट, गाल आत गेलेले, अंगाने सडपातळ, केस पिकलेले व पुढील बाजूस टक्कल, दाढी व मिशी काढलेली, अंगात आकाशी रंगाचा हाफ टी-शर्ट व नेसणीस पांढऱ्या रंगाची हाफ पॅन्ट, तिच्यावर काळे पट्टे असून पायात पावसाळी साधी चप्पल आहे. या वर्णनाची व्यक्ती कोणाला सापडल्यास त्यांनी पोलिसात संपर्क साधावा.