तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलची चमकदार कामगिरी
7 विद्यार्थी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र
रत्नागिरी (प्रतिनिधी): श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल, झाडगाव येथील विद्यार्थ्यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत लक्षवेधी यश संपादन केले आहे. या स्पर्धेत 18 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून 7 विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
नुकत्याच छत्रपती शिवाजी स्टेडियम, रत्नागिरी येथील बॅडमिंटन हॉलमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 14 आणि 17 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली.
जिल्हास्तरावर निवड झालेले खेळाडू (14 वर्षे वयोगट): आर्यन यादव डाखोरे, साईराम महीपती जाधव, वेदांत रामदास खोत, विकास चंद्रकांत पाटील, रुद्रा अजित चव्हाण. (17 वर्षे वयोगट): योगेश बाळासो खोत, अभिनव अमोल जाधव
याशिवाय, अनेक विद्यार्थ्यांनी द्वितीय व तृतीय क्रमांकाचे यश मिळवले. यात 14 वर्षे वयोगटातील रुद्र राहुल येळावडेकर (तृतीय, 35 किलो), सुदर्शन बाळासो खोत (द्वितीय, 41 किलो), संभव इंद्रजित पांडव (तृतीय, 41 किलो), वेदांत सतीश खोत (तृतीय, 48 किलो), पलक अस्लम मुल्ला (द्वितीय, 30 किलो) आणि आयेशा इब्राहिम शेख (द्वितीय, 39 किलो) यांचा समावेश आहे. तसेच, 17 वर्षे वयोगटातील मेहबूब सलीम शेख (द्वितीय, 45 किलो), सर्वेश दिपक नरुटे (तृतीय, 48 किलो), तेजस शंकर धोत्रे (तृतीय, 55 किलो), वीरेन कुंडलिक नरके (तृतीय, 60 किलो) आणि आर्यन रमेश चव्हाण (द्वितीय, 71 किलो) यांनीही यश संपादन केले.
या विद्यार्थ्यांच्या यशासाठी क्रीडा शिक्षक एम. डी. पाटील आणि सैफुद्दीन पठाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्याचबरोबर जिल्हा कुस्ती असोसिएशनचे अध्यक्ष भाई विलणकर, उपाध्यक्ष आनंद तापेकर, कार्यवाह सदानंद जोशी आणि कोच झाकीर सय्यद, तसेच योगेश हळदवणेकर यांचेही विशेष मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे, सचिव शुभांगी गावडे, विभागप्रमुख श्रीराम साळुंखे, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, संपर्क निरीक्षक हुसेन पठाण, मुख्याध्यापक आनंदा पाटील यांच्यासह सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. या कामगिरीमुळे शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.