वाहतुकीस अडथळा, चालकाविरोधात गुन्हा
मंडणगड : देव्हारे येथे सार्वजनिक ठिकाणी वाहतुकीस अडथळा होईल, असे वाहन उभे करणाऱ्या संजय आत्माराम तांबे (५२, देव्हारे, बौद्धवाडी) याच्यावर बुधवारी बाणकोट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत बाणकोट सागरी पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर पवार यांनी नोंदवलेल्या फिर्यादीनुसार संजय तांबे यांनी बुधवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास देव्हारे पोलीस दूरक्षेत्रासमोर असलेल्या मुख्य रस्त्यावर चारचाकी वाहन (एमएच ०८ एजी ३७३७) अन्य वाहनांना अडथळा होईल, असे उभे केले होते. त्यामुळे या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.