‘त्या’ मनोरुग्ण वृद्धेचा मृतदेह आढळला
चिपळूण : दहिवली खुर्द- पुनवतवाडी येथील मनोरुग्ण वृद्धेचा बुधवारी सायंकाळी ५.३० वाजता कापशी नदीत मृतदेह आढळून आला. याबाबत सावर्डे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
लक्ष्मी भुवड (७८) असे या वृद्धेचे नाव असून त्या १९ रोजी घरातून निघून गेल्याने याची खबर नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार शोध सुरू होता. बुधवारी त्यांचा मुलगा दीपक व प्रशांत डावल हे आजूबाजूचा परिसर व नंदीच्या बाजूने शोध घेत असताना त्यांना नदीपात्रात मृतदेह दिसून आला.