ट्रेलरच्या धडकेत मोटारचालक जखमी
खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील तालुक्यातील आवाशी शेतीशाळेसमोर ट्रेलरच्या धडकेने मोटारचालक जखमी झाला. हा अपघात १७ ऑगस्टला दुपारी पावणेतीनच्या सुमारास झाला.
आवाशी मधलीवाडी येथील सुरेश श्रीपत आंब्रे (वय ६०) मोटारीने आवाशी ते खेड रेल्वेस्टेशन असे जात होते. त्यावेळी आवाशी शेतीशाळेसमोरील रस्त्यावर त्यांच्या पाठीमागून आलेल्या ट्रेलरने मोटारीला धडक दिली. याप्रकरणी ट्रेलरचालक सीताराम नामदेव कोडग (३९, सध्या रा. कळंबोली, ता. पनवेल) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अपघातात आंब्रे यांच्या डोक्याला दुखापत झाली.