टेम्पो-मोटारीच्या धडकेत एक जखमी
खेड : तालुक्यातील खेड-दापोली मार्गावरील फुरूस-सुकदर फाटा येथील मोरीवर छोटा टेम्पोने मोटारीली धडक दिली. यामध्ये मोटारीचा चालक जखमी झाला आहे. हा अपघात रविवारी (ता. १७) दुपारी दीडच्या सुमारास झाला.
अपघातातील जखमी अनिकेत मुरलीधर भंडारी (वय ३५, रा. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) हे मोटार घेऊन मुंबईवरून दापोलीकडे जात होते. फुरूस-सुकदर फाटा येथील मोरीवर समोरून येणाऱ्या छोट्या टेम्पोने त्यांच्या मोटारीला धडक दिली. यामध्ये भंडारी जखमी झाले. या प्रकरणी भंडारी यांनी तक्रार दिली असून, टेम्पोचालक सागर आनंद नलावडे (रा. महात्मा फुले नगर, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.