७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पन्हळी येथे उत्साहात साजरा
रत्नागिरी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पन्हळी येथे ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशप्रेमाने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली. मुसळधार पावसातही छत्र्यांचा आधार घेत विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी, पालकांनी व ग्रामस्थांनी राष्ट्रध्वजाला अभिवादन केले.
“वन्दे मातरम्” व “भारत माता की जय” च्या घोषणांनी परिसर दुमदुमला.
विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर भाषणं व कवायत सादर केली. प्रमुख पाहुण्यांनी प्रेरणादायी भाषणं केली.
स्पर्धांमधील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आलं.
हस्तकला प्रदर्शनात विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचं प्रदर्शन लावण्यात आले.
कार्यक्रमाचा समारोप अध्यक्षांच्या मनोगताने व खाऊ वाटपाने झाला.
पावसाच्या सरीतही साजरा झालेला हा सोहळा उपस्थित प्रत्येकासाठी अविस्मरणीय ठरला.