नीलेशवर चिपळुणातच अंत्यसंस्कार
चिपळूण : शहरातील गांधारेश्वर येथील वाशिष्ठी नदीच्या पुलावरून दाम्पत्याने उडी मारल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेनंतर तीन. दिवसांनी पत्नी अश्विनीचा, तर पाच दिवसांनी नीलेश अहिरेचा मृतदेह मालदोली खाडीत रविवारी सापडला.
नीलेश याच्यावर चिपळुणातच रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. आश्विनीप्रमाणे त्याचाही खासगी बोटीतून त्याचे नातेवाईक तर गावाकडील मंडळी शोध घेत असताना चार दिवसांच्या शोधाअंती नीलेशचा शोध न लागल्याने याबाबत अनेक तर्क-वितर्कासह चर्चांना जोर आला होता.