वेरळमध्ये ३५ वर्षीय तरुणाची गळफासाने आत्महत्या
खेड : तालुक्यातील वेरळ येथे ३५ वर्षीय तरुणाने घरी दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. अशोक हनुमंत कोळेकर असे मृत तरुणाचे नाव आहे. तो क्षयरोगाच्या आजाराने त्रस्त होता. या आजाराला कंटाळून दुमजली घराच्या पहिल्या माळ्यावरील खोलीत गळफास लावून घेतला. कुटुंबियांनी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.