रत्नागिरी नाचणे जि.प. गट येथे आगळीवेगळी मंगळागौर स्पर्धा व महिला आनंदोत्सव साजरा करण्यात आला
रत्नागिरी : उदय सामंत प्रतिष्ठान रत्नागिरी आयोजित “श्रावणोत्सव मंगळागौर” स्पर्धा आणि महिला आनंदोत्सव – २०२५ या कार्यक्रमामध्ये मा. आमदार डॉ. उदय रविंद्र सामंत, मंत्री – उद्योग व मराठी भाषा आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या संकल्पनेनुसार शासकिय वैद्यकिय महाविद्यालय रत्नागिरी यांच्यावतीने “अवयवदान , देहदान व रक्तदान” याबाबत उपस्थित महिलांना जनजागृती करण्यात आले.
तसेच आज ‘१५ वा भारतीय अवयवदान दिवस ‘ असल्याने उपस्थित सर्वांनी अवयवदान बाबत जनजागृतीची शपथ घेतली.
उदय सामंत प्रतिष्ठान रत्नागिरी आयोजित श्रावणोत्सव मंगळागौर स्पर्धा आणि महिला आनंदोत्सवाचे यंदाचे ३ रे वर्ष आहे. ही स्पर्धा आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात येत आहे. मंगळागौर स्पर्धेमधे सहभागी महिलांनी गायन- नृत्य याद्वारे वेगवेगळे सामाजिक संदेश दिले. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रत्नागिरी चे समाजसेवा अधिक्षक श्री. रेशम जाधव यांनी अवयवदान, देहदान, व रक्तदान याबाबत उपस्थित महिलांना अवयवदान – देहदान का करावे, अवयवदान – देहदान मधील फरक, त्याचे महत्व, कोणत्या वयातील व्यक्ती अवयवदान – देहदान करू शकते ? याबाबत सविस्तर माहिती दिली तसेच अवयवदान व देहदान बाबत संकल्प करायचा असेल तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे संपर्क साधण्याचे आवाहन केले.
सदर कार्यक्रमाला मा.आमदार डॉ. उदय सामंत यांचे स्विय सहाय्यक श्री. दिपक मोरे, महिला तालुका प्रमुख सौ. कांचन नागवेकर, विभाग प्रमुख सौ. स्नेहल वैश्वपायन, सौ. साक्षी भुते,
सौ. नाईक, विभाग प्रमुख श्री. प्रकाश रसाळ, उप तालुका प्रमुख श्री.प्रकाश शिंदे, तसेच नाचणे जि.प.गट विभाग प्रमुख –
सौ. विद्या बोंबले , सौ. स्वरा देसाई , सौ.पुनम देसाई,
सौ.माधवी गीते, लांजा तालुका प्रमुख सौ. मानसी आंबेकर आणि श्री.भैय्या भोंगले सरपंच नाचणे ग्रामपंचायत आणि मंगळागौरसाठी बहुसंख्येने सहभागी महिलांच्या उपस्थितीत पार पडला.