किल्ले रत्नदुर्ग वर प्लास्टिक मुक्त संवर्धन मोहीम यशस्वी.
सफर सह्यदुर्गाची संस्था यांचे आयोजन.
रत्नागिरी– आज रविवार दिनांक -३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी आठ वाजता ” किल्ले रत्नदुर्ग” येथे किल्ले रत्नदुर्ग वर खूप मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक कचरा येणाऱ्या नागरिकांकडून सर्वत्र टाकलेला दिसतोय. या मध्ये प्रामुख्खाने बाॅटल, आणि खाद्य पदार्धाचे पॅकिंग आवरण / रॅपर कागद या मुळे सर्वत्र कचरा साचलेला दिसतो .
हिच बाब लक्षात घेऊन “सफर सह्यदुर्गांची” संस्थेने प्लास्टिक मुक्त संवर्धन मोहीम चे आज आयोजन केले होते.
या मोहिमचे शुभारंभ करण्यासाठी प्रमुख मान्यवर म्हणून जिजाऊ संस्था रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष ॲड. श्री.महेंद्र मांडवकर सर व त्यांच्या सोबत प्रमुख उपस्थिति म्हणून फणसवळे गावचे सरपंच श्री. निलेश लोंडे हे उपस्थित होते.
किल्ले रत्नदुर्ग प्लास्टिक मुक्त संवर्धन मोहीम यशस्वी करण्यासाठी श्री. मयूर भितळे, शुभम आग्रे, सौरव बळकटे, सुरज खोचाडे, अक्षय भोसले, ओंकार सावंतदेसाई, खुशी गोताड, तेजस खापरे, दर्शन शेळके, सेजल मेस्त्री, अक्षय घाग, नयन कदम, रश्मी जाधव हे सर्व “सफर सह्यदुर्गाची ” संस्थेचे सदस्य यांच्या वतीने ही स्वच्छता मोहीम यशस्वीरित्या राबवण्यात आली.