सतत प्रेयसीसोबत फोनवर बोलल्याच्या रागातून मामाकडून भाच्याचा खून
रत्नागिरी:-
कामाच्या ठिकाणी सतत प्रेयसीसोबत फोनवर बोलत असल्याच्या रागातून चुलत मामाने भाच्याच्या छातीत सुतारकामासाठी वापरणारी आरी छातीत खुपसून खून केल्याची घटना शनिवारी दुपारी मिरकरवाडा- खडपमोहल्ला येथे दुपारी 3 ते 3.30 वा.सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलिसांनी पळून जाणार्या दोन संशयितांना पोलिसांनी रेल्वे स्टेशन येथून तर एकाला घटनास्थळावरुन ताब्यात घेतले.
प्रिन्स मंगरू निषाद (19 रा.गोरखपूर,उत्तरप्रदेश) असे खून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तर या प्रकरणात मुख्य संशयित म्हणून निरज निषाद आणि त्याचे साथिदार अनूज चौरसिया व रविकुमार भारती (सर्व रा.गोरखपूर,उत्तर प्रदेश)या तिघांना शहर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. गेल्या काही दिवसांपासून मिरकरवाडा खडक मोहल्ला येथे एका मोबाईल शॉपीचे काम सुरु होते. गोरखपूर येथील 4 कामगार तिथे फर्निचरचे काम करत होते. त्यामध्ये मयत प्रिन्स निषाद व त्याचा मामा व अन्य दोन कामगार होते. शनिवारी दुपारच्या वेळेस काम सुरु असताना प्रिन्स आणि त्याचा मामा यांच्यात प्रिन्स सतत मोबाईलवर बोलत असतो या रागातून वाद झाला.या वादातून हाणामारी झाली. संतप्त झालेल्या मामाने सुतार कामासाठी वापरणारी आरी प्रिन्सच्या छातीत खुपसली. हा घाव इतका वर्मी होता की प्रिन्सचा जागीच मृत्यू झाला.
या हलल्यानंतर निरज निषाद आणि अनूज चौरसिया हे दोघे संशयित आरोपी घटना स्थळरावरून पसारा झाले. या सर्व प्रकाराने घाबरलेल्या रविकुमारने भारतीने

आजुबाजुच्या नागरिकांना खूनाची माहिती दिल्यांतर त्यांनी त्याला ‘112’ ला फोन करण्यास सांगितले. त्याप्रमाणे रविकुमारने फोन केल्यानंतर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रविकुमाने पोलिसांनी दोन्ही संशयित आरोपीचे मोबाईल नंबर पोलिसांना दिले. त्यावरून पोलिसांनी त्यांचे लोकेशन शोधले त्यावेळी ते रेल्वे स्टेशनला असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने एक पथक तिथे पाठवले. रेल्वेतून पाळण्याच्या तयारीत असलेल्या संशितांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या.