सोंडेघर धरणाजवळील पंप हाऊस परिसरातून लोखंडी चॅनल चोरीला
दापोली: जिल्हा परिषद पाणीपुरवठा योजना अंतर्गत सोंडेघर धरणा शेजारील विहिरीवरील पंप हाऊसजवळ मोटार टाकण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या लोखंडी चॅनलची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीमुळे पाणीपुरवठा योजनेच्या कामात अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.
29 जुलै 2025 रोजी सायंकाळी सहा ते 30 जुलैच्या सकाळी सहा वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने अंदाजे 10 हजार रुपये किमतीचे, वापरात असलेले दोन फूट 20 फूट लांबीचे लोखंडी चॅनल चोरून नेल्याची तक्रार संबंधित विभागाने दापोली पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
या प्रकरणी 31 जुलै 2025 रोजी संध्याकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास दापोली पोलीस करीत आहेत.