प्रेयसी बोलत नाही म्हणून तरुण विष प्याला
तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू
रत्नागिरी : तरुणाने विष प्राशन केल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील कुंडी धावडेवाडी येथे घडली आहे. सोहम राजाराम पवार असं त्याचं नाव आहे. त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रेयसी बोलत नसल्याच्या नैराश्यातून त्याने हे कृत्य केलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सोहम याची प्रेयसी गेले चार-पाच दिवस त्याच्याशी बोलत नव्हती. या नैराश्येतून त्याने बुधवारी विष प्राशन केलं. सोहमला अस्वस्थ वाटू लागल्याने देवरूख ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.
प्रकृती गंभीर असल्याने त्याला अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेची नोंद देवरुख पोलिस स्थानकात करण्यात आली असून, याबाबत अधिक तपास देवरूख पोलिस स्थानकाचे निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.