धुळ्यातील जोडप्याने विशिष्ठी नदीत उडी घेत संपवले जीवन
चिपळूण: धुळे जिल्ह्यातील एक जोडपे कोकणात पर्यटनासाठी आल्यानंतर त्यांनी येथील चिपळूण येथील विशिष्ठी नदीत उडी घेत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि आपत्ती बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.चिपळूणमधील वाशिष्ठी नदीत अश्विनी निलेश आहिरे (वय १९) व तिचा पती निलेश रामदास आहिरे (वय २६) या दोघांनी उड्या टाकून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. युवती बुडतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दोघांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. चिपळूण पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत.
चिपळूणमधील गांधेश्वर मंदिराच्या येथील ही घटना असून युवती पाण्यात बुडताना व्हिडिओमध्ये आहे. दरम्यान, एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पाण्यातून मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याप्रकरणी, चिपळून पोलिस अधिक तपास करत आहे.