विषारी औषध प्राशन केलेल्या वृद्धेचा मृत्यू
रत्नागिरी ः
अज्ञात कारणातून विषारी औषध प्राशन केलेल्या वृध्देचा उपचारांदरम्यान कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात मृत्यू झाला.
सुनिता चंद्रकांत जाधव (70,रा.नाखरे,रत्नागिरी) असे उपचारांदरम्यान मृत्यू झालेल्या वृध्देचे नाव आहे. तीने 24 जुलै रोजी रात्री 9.30 वा.सुमारास राहत्य घरी ग्रामोझोन नावाचे विषारी औषध प्राशन केले होते. ही बाब तिचे पती चंद्रकांत जाधव यांच्या लक्षात येताच त्यांनी तिला प्रथम जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर अधिक उपचारांसाठी कोल्हापूरला सीपीआर रुग्णालयात दाखल केले होते. त्याठिकाणी उपचारांदरम्यान 25 जुलै रोजी सकाळी 10.30 वा. त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पूर्णगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.