गावठी दारु विक्री करणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः विनापरवाना हातभट्टीच्या दारुची विक्री करणाऱ्या महिलेविरुद्ध लांजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (ता. २७) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास गवाणे-चव्हाणवाडी येथील एका पडक्या घराजवळ निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित महिला ही विनापरवाना हातभट्टीची गावठी ४५० रुपयांची ४ लिटर दारु विक्री करण्याच्या उद्देशाने सापडली. या प्रकरणी महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल उर्मिला शेंडे यांनी लांजा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.