अपघात जखमी झालेल्या वृध्दाचा उपचारादरम्यान मृत्यू
खेड: मोरवंडे – सुतारवाडी येथील अपघात जखमी झालेल्या वृद्धाचे चिपळूण येथील लाईफ केअर रूग्णालयात उपचारादरम्यान . २१ मार्च रोजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान निधन झाले. राजाराम गणपत काणेकर (वय -७८) असे या मयत झालेल्या वृद्धाचे नाव आहे.
वृद्ध राजाराम गणपत काणेकर यांचा तालुक्यातील शिवफाटा येथे अपघात झाल्याने त्यांना उपचाराकरीता चिपळूण येथील लाईफ केअर रुग्णालयात दाखल केले होते. त्याठिकाणी उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले .या घटनेची नोंद येथील पोलीसांनी केली आहे.