इंडियन कोस्ट गार्ड कार्यालय, रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय न्यायाचा जागतिक दिन व पॉश अॅक्ट कायद्याबद्दल मार्गदर्शन सत्राचे आयोजन.
रत्नागिरी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी यांच्याकडून जागतिक आंतराष्ट्रीय न्याय दिनानिमित्त इंडियन कोस्ट गार्ड कार्यालय, रत्नागिरी येथे विशेष मार्गदर्शन सत्राचे दिनांक १७/०७/२०२५ रोजी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पॉश अॅक्ट (कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रबंधक कायदा, २०१३) या विषयावरही सखोल माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाला मा. श्री. एस. एस. गोसावी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी, मा. श्री. आर. आर. पाटील, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी, डी. आय. जी. श्री. टी. एन. उपाध्याय, कमांडिंग ऑफिसर, श्री. शैलेश गुप्ता, तसेच एग्जिकेटिव्ह ऑफिसर, श्री. जे. एस. ढिल्लोन, वकिल श्री. अमित अनंत शिरगांवकर यांच्यासह कोस्ट गार्डचे सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे, सचिव, श्री. आर. आर. पाटील यांनी आंतरराष्ट्रीय न्याय दिनाचे महत्व विशद केले तसेच पॉश अॅक्ट २०१३ या कायद्यावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर अॅड. श्री अमित अनंत शिरगांवकर यांनी देखील पॉश अॅक्ट कायद्यावर मार्गदर्शन करत महिलांच्या सुरक्षिततेविषयी जागरूकता निर्माण केली.