तोल जाऊन पडलेल्या वृद्धेचा मृत्यू
रत्नागिरी : हृदयविकाराच्या आजाराने चार वर्षे आजारी असलेली वृद्ध महिला तोल जाऊन पडली. तिच्या डोक्याला दुखापत झाली. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. अंजली गंगाधर लिंगायत (वय ७०, रा. लक्ष्मी प्रसाद अपार्टमेंट, जोशी-पाळंद, रत्नागिरी) असे मृत वृद्ध महिलेचे नाव आहे. ही घटना रविवार २० जुलै रोजी सायंकाळी ४.४५ वा. सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली. अंजली यांना चार वर्षापासून हृदयविकाराचा आजार होता. रविवारी रुमच्या हॉलमध्ये बसल्या असताना त्या तोल जाऊन पडल्या त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.