बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या प्रौढाचा मृत्यू
रत्नागिरी ः ट्रकमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या प्रौढाला उपचारासाठी साखरपा आरोग्य केंद्रात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. देवरुख पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गुरुपादप्पा सिद्धरामप्पा कल्याणशेट्टी (वय ४२, रा. एकुंडी ता. सौदली, जि. बेळगाव, राज्य कर्नाटक) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १८) सकाळी दहा ते दुपारी एकच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुपादप्पा कल्याणशेट्टी हे रत्नागिरी कोल्हापूर रस्त्यावर एका टपरीजवळ (ता. संगमेश्वर) येथे ट्रक मध्ये बेशुद्ध अवस्थेत होते. त्यांना उपचारासाठी साखरपा आरोग्य केंद्रात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.