खंडाळा- वाटद येथे संरक्षण प्रकल्पाविरोधात भव्य मोर्चा
उद्यमंत्री सामंतांच्या मतदारसंघातच विरोध
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्याच्या वाटद- खंडाळा येथे प्रस्तावित संरक्षण शस्त्रसामग्री तयार करणाऱ्या प्रकल्पाविरोधात आज स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी भव्य मोर्चा काढला. विशेष म्हणजे, हा प्रकल्प

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याच मतदारसंघांतर्गत येत असल्याने याविरोधातील जनआंदोलनाला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रकल्पासाठीच्या जमीन अधिग्रहणाची सूचना रद्द करावी, या मुख्य मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.त्यानंतर सभा घेण्यात येणार आहे.
