रत्नागिरीच्या एसआरके तायक्वांदो क्लबची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरु
रत्नागिरी:
एसआरके तायक्वांदो क्लब गेली 17 वर्षे रत्नागिरीत यशस्वीपणे कार्यरत आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, रत्नागिरीच्या सुसज्ज हॉलमध्ये खेळाडूंना तायक्वांदोचे मार्गदर्शन दिले जाते.
आजपर्यंत अनेक राज्य, राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू या क्लबच्या माध्यमातून घडले आहेत. प्रशस्त हॉल, सरावासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची साधने व तज्ञ प्रशिक्षकाच्या माध्यमातून दररोज सकाळी व संध्याकाळी खेळाडूंना प्रशिक्षण दिले जाते. कोरियन मार्शल आर्ट प्रकारात समाविष्ट असणारा तायक्वांदो हा खेळ ऑलम्पिकमध्येही खेळला जातो. बेल्ट परिक्षेच्या माध्यमातून खेळाडूंच्या क्षमतेला वाव मिळतो तसेच तायक्वांदोच्या अगदी तालुकास्तरीय स्पर्धांपासून आंतरराष्ट्रीय स्पर्धेपर्यंत खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळते. खेळाडूंना याचा जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी क्लबचे अध्यक्ष अमोल सावंत त्यांनी प्रशिक्षणाचे प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन जाहीर केली आहे.
प्रवेश घेण्यासाठी क्यू आर कोड स्कॅन करा.